दरम्यान, येत्या दोन दिवसांत सगळे राज्याचे सर्व पालकमंत्री जाहीर होतील व १५ऑगस्ट पर्यंत प्रत्येक जिल्हयात जाऊन पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होईल असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या मेडिकल कॉलेजची इमारत पूर्ण होईपर्यंत हे कॉलेज महिला रुग्णालयात सुरू होणार आहे. महिला रुग्णालय, शासकीय रुग्णालय व मनोरुग्ण रुग्णालय याचा भाग वापरून हे कॉलेज सुरू होणार आहे मनोरुग्णालय १४ एकर जमिनीत असून त्यातील ४ एकर जमीन या मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी २ ते ३ वर्षात बांधून पूर्ण होईल अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
या मेडिकल कॉलेजसाठी ५०० कोटींचा निधी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर केला आहे. आजवरच्या सगळ्या सरकारांपेक्षा आपले सरकार हे अधिक गतीमान पद्धतीने काम करणारे सरकार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
१४ तारखेला मंत्री उदय सामंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर!
मंत्री उदय सामंत १४ ऑगस्टपासून रत्नागिरी दौऱ्यावर असून हा दौरा रायगड जिल्ह्यापासून सुरू होईल. हा दौरा पूर्णपणे शासकीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील कामाबाबत बैठकही होणार आहे. चिपळूण, संगमेश्वर करून मंत्री उदय सामंत रत्नागिरीत आपल्या मतदारसंघात येणार आहेत. तेथे रत्नागिरी शहरातील शिवसृष्टी व बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत रत्नागिरी शहरालाएज्युकेशन हब बनवण्याबाबत विचारविनियम करण्यात आला असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्ग बाबत मुख्यमंत्री ३ दिवसांत सविस्तर माहिती देणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.