मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.
पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.
The paper is beautifully written, has amazing substance, and a delicate map of dispersion. geometry dash
When I read an article on this topic, safetoto the first thought was profound and difficult, and I wondered if others could understand.. My site has a discussion board for articles and photos similar to this topic. Could you please visit me when you have time to discuss this topic?
Your explanation is organized very easy to understand!!! I understood at once. Could you please post about baccaratsite ?? Please!!
Excellent to the point article and news.. Well appreciated, My sites:
okbet mnl