सिंधुदुर्ग: संदर्भातील टेस्टिंग लॅबचं राजकारण न करता जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख काम करावे. लोकांच्या जीवाशी खेळू नये. टेस्टिंग लॅब जिल्ह्यात झालीच पाहिजे. सध्या जो रिपोर्ट घेण्यासाठी वेळ लागतो तो लागू नये म्हणून लॅब होणे अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने राजकारण न करता जिल्ह्याच्या आरोग्याचा विचार करावा. असे न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार यांनी आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

राणे पुढे म्हणाले की, आमच्या मालकीचे पडवे येथील हॉस्पिटल सुसज्ज असून टेस्टिंग लॅबसाठी हॉस्पिटलला विचारणा करण्यात आली होती. तिथे पाहणीही झाली आणि नंतर सुविधा मिळणार नाहीत, असे सांगून या विषयी केवळ राजकारण केले गेले.

कुठेही करा पण करोना टेस्टिंग लॅब जिल्ह्यात झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि यात राजकारण झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असे नितेश राणे म्हणाले. लॅबसाठी लागणारी मशिनरी आणि मनुष्यबळ आपल्याकडे आहे. तुम्ही कुठेही लॅब सुरू करा मी मशिनरी देतो, अशी तयारीही त्यांनी दर्शवली. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार प्रमोद जठार, डॉ. मिलिंद कुलकर्णी होते.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here