Shahaji Bapu Patil Raksha Bandhan 2022 | चीक महूद मधील महिलांनी आमदार पाटील यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास तीनशे ते साडे तीनशे महिलांनी आज चीक महुद मध्ये हा सण साजरा केला. यावेळी मायेची भेट म्हणून बापूंनी ओवाळणी म्हणून या बहिणींना साडी भेट म्हणून दिली. शहाजीबापूंच्या या रक्षाबंधनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हायलाइट्स:
- आमदार शहाजी बापू पाटील यांच्या घरी राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावातील शेकडो महिलांची गर्दी
- शहाजीबापू गुवाहाटीत असताना एका फोन कॉलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले
- शहाजीबापूंनी साजरं केलं रक्षाबंधन
यांनतर चीक महूद मधील महिलांनी आमदार पाटील यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास तीनशे ते साडे तीनशे महिलांनी आज चीक महुद मध्ये हा सण साजरा केला. यावेळी मायेची भेट म्हणून बापूंनी ओवाळणी म्हणून या बहिणींना साडी भेट म्हणून दिली. शहाजीबापूंच्या या रक्षाबंधनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चंद्रकांत पाटलांना रक्षाबंधनाची खास भेट
जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मानलेल्या भावाला अर्थात भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना खास देशी बियांणापासून बनवलेल्या राख्या भेट म्हणून पाठवल्या आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणेसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचे संवर्धन केलं आहे. त्यांचे संशोधन इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी घरातच एका जुनाट खोलीत बीजबँक स्थापन केली. त्यांचे कार्य बायफ या संस्थेने जगासमोर आणले आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंच्या कामाची दखल घेतली. चंद्रकांत पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये अवघ्या ४० दिवसात राहीबाई यांना नवीन आणि पक्की बीजबँक बांधून दिली. उद्घाटनाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांनी राहीबाईंचा उल्लेख बहीण म्हणून केला. तेव्हापासून राहीबाई या चंद्रकांत पाटलांना आपला भाऊ मानतात.
यावर्षी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खास देशी बियाणांपासून ‘बीज राखी’ बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट दिली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.