ओडिसा : महाराष्ट्राच्या जालन्यामध्ये इनकम टॅक्स विभागाची आठ दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या कारवाईमध्ये तब्बल ३९० कोटी रुपये जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर आता आणखी एक मोठी कारवाई ओडिसामध्ये करण्यात आली आहे. ओडिसाच्या उत्पादन शुल्क पथकाने गंजम जिल्ह्यामध्ये लांजीपल्ली इथं महाराष्ट्रातल्या एका व्यावसायिकाच्या ताब्यातून मोठी संपत्ती जप्त केली आहे.
९ ऑगस्ट रोजी उत्पादन शुल्क पथकाने ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक हा महाराष्ट्रातला असून त्याच्याकडे १.२२ कोटी कसे आले याचाही शोध सुरू आहे.
पथकाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी नेहमीप्रमाणे गंजम नॅशनल हायवेवर तपास करत असताना एका ड्रग्ज तस्कराची चौकशी करण्यात आली. त्याचा तपास घेताच ही धक्कादायक माहिती उघड झाली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.