रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. गळफास लावून महिलेनं स्वत:ला संपवलं. चंदा असं या महिलेचं नाव आहे. आत्महत्या करण्याआधी तिनं संपूर्ण आपबिती घरातील भिंतींवर लिपस्टिकनं लिहिली. चंदानं तिच्या पती आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

चंदानं २०१९ मध्ये सीसीएलमध्ये कार्यरत असलेल्या दिलीप चौहानशी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही उत्तम सुरू होतं. त्यानंतर पती-पत्नीमध्ये लहानसहान विषयांवरून भांडणं सुरू झाली. कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी दोघांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र भांडणं सुरूच राहिली.
संस्कारी चोर! आधी देवीसमोर हात जोडले, माफी मागितली, दानपेटी चोरली अन् मग…
रांचीपासून ७० किलोमीटर दूर असलेल्या खलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डकरा गावात ही घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पती नेहमी मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा, असं महिलेनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याचमुळे आत्महत्या केल्याचं तिनं नोटमध्ये नमूद केलं आहे.
आता १ लाख घ्या, ५ नंतर देतो! विम्याच्या ३५ लाखांसाठी पतीनं पत्नीची सुपारी दिली अन् मग…
चंदानं तिच्या दोन मुलांसह गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यानं दोन मुलांचा जीव वाचला. दरवाजा तोडून शेजारी घरात घुसले त्यावेळी भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पाहून त्यांना धक्का बसला. भिंतीवरील सुसाईड नोट लक्षात घेऊन पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि सासरच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पोलीस हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अनुषंगानं तपास करत आहेत. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here