परभणी : मित्राने तंबाखू न दिल्याने रागाच्या भरात दोघेजण मला मारहाण करत आहेत अशी खोटी माहिती खोटी पोलिसांना देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सदरील घटना मानवत तालुक्यातील रामपुरी बु येथे घडली आहे. याप्रकरणी कॉल करणाऱ्या व्यक्ती विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंजाजी एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीचे नाव आहे.

मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस नायक सय्यद फैयाज सय्यद बाबुलाल हे कर्तव्यावर असताना मानवत तालुक्यातील रामपुरी बू. येथील मुंजाजी एकनाथ गायकवाड याने ११२ क्रमांकावर कॉल केला. यामध्ये त्याने दोन व्यक्ती मला मारहाण करीत आहेत. तात्काळ मदत पाठवा असे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस नायक फैयाज सय्यद, नरेंद्र कांबळे, पोलीस वाहन चालक इंगळे हे माहिती मिळालेल्यानुसार तातडीने रामपुरी बू. येथे धाव घेतली.

Jalna IT Raid: जालन्यात अजय देवगनच्या ‘रेड’ स्टाइल छापा; महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार, ३९० कोटी जप्त
गावातील बसस्थानक परिसरातील शनि मंदिराजवळ पोलीस पोहोचले. तक्रारदार मुंजाजी गायकवाड यांची भेट घेऊन विचारपूस केली असता गावातील मित्राला तंबाखू मागितली होती. मात्र, त्याने तंबाखू न दिल्याने बाचाबाची झाली. मला कोणीही मारहाण केली नाही, मी रागाच्या भरात ११२ वर कॉल केला होता असे सांगितले. त्यामुळे ११२ क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलीस नाईक फैयाज सय्यद यांच्या तक्रारीवरून मुंजाजी एकनाथ गायकवाड यांच्या विरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जालन्यानंतर आणखी एक मोठी कारवाई, मराठी व्यापार्‍याकडून १.२२ कोटी अन् २० सोन्याची बिस्कीटं परराज्यात जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here