मात्र, सोशल मीडियावर भावना गवळी यांच्या या पोस्टची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्या शिवसेनेच्या इतर १२ आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांच्या काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळी यांच्यापाठी ‘ईडी’चा ससेमिरा लागला होता. त्यांच्या एका निकटवर्तीयाला ईडीकडून अटकही करण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर भावना गवळी यांच्यापाठी लागलेली ‘ईडी-पीडा’ दूर होईल, अशी चर्चा होती. अशातच इतके दिवस केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर असलेल्या भावना गवळी रक्षाबंधनाच्या दिवशी थेट पंतप्रधान मोदी यांनी राखी बांधायला पोहोचल्या. त्यामुळे आता भावना गवळी यांच्यापाठी लागलेले ईडीचं सावट दूर होणार का, याविषयी चर्चांना उत आला आहे.
भावना गवळींच्या सहकाऱ्याचा मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन मंजूर
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात सप्टेंबरमध्ये सईद खान यांना अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
भावना गवळी शिंदे गटात, पण घटस्फोटित पती मात्र ठाकरेंसोबत
भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रशांत सुर्वे यांचा २००४ साली भावना गवळी यांच्याशी विवाह झाला होता. ९ वर्ष सुखी संसार केल्यानंतर त्यांनी काही कारणांनी २०१३ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१३ सालीच त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भावना गवळी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र, या निवडणुकीत प्रशांत सुर्वे यांना अपयश आलं. त्यांचा पराभव झाला होता. प्रशांत सुर्वे हे एयर इंडियात फ्लाइट कॅप्टन म्हणून कार्यरत होते. भावना गावळींशी विवाह झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली होती. मात्र घटस्फोटानंतर त्यांनी काही खाजगी कंपन्यांमध्ये फ्लाईट कॅप्टन म्हणून काम केलं आहे. ते सध्या राजकारणात फार सक्रिय नसले तरी अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. मतदार संघातही अनेक जुन्या शिवसैनिकांशी त्यांचा संपर्क कायम आहे.