woman beating video, VIDEO : बारामतीत महिलेला मारहाण करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल, ९ जणांवर गुन्हा दाखल – video beating woman in baramati viral on social media case registered against 9 people
बारामती : मोकाट सोडलेल्या डुकरांचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने त्याबाबत सुरू असलेल्या बैठकीत वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला असून मारहाण प्रकरणी येथील महिलांनी दिलेला फिर्यादी वरून बारामती शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील खंडोबा नगर येथील भोई गल्ली येथे ही घटना घडली.
Jalna IT Raid: जालन्यात अजय देवगनच्या ‘रेड’ स्टाइल छापा; महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार, ३९० कोटी जप्त पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की, दि.१० रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान शहरातील खंडोबा नगर येथील भोई गल्ली या ठिकाणी डुकरांमुळे स्थानिक लोकांना असणाऱ्या त्रासाबाबत डुक्कर पालन करणारे व स्थानिक नागरिकांमध्ये बैठक सुरू होती. सदर बैठक सुरू असताना आरोपींनी फिर्यादी व इतर लोकांना मारहाण केली. सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत सदर महिला यांनी शेअर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दाखल फिर्यादी वरून वरील नऊ जणांवर बेकायदा जमाव जमवणे, मारहाण करणे, महिलांचा विनयभंग करणे ,जबरदस्तीने मोबाइल चोरून नेणे, अल्पवयीन मुलीला लज्जास्पद मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.