या वयोवृद्ध जोडप्याला IVF तंत्रज्ञानामुळे मूल जन्माला घालणे शक्य झाले आहे. मात्र जगात असे हे पहिलेच उदाहरण आहे असे नाही. जगभरातील अनेक वृद्ध जोडप्यांनी ७० ते ८० या वयोगटात मुलांना जन्म दिलेला आहे. मात्र राजस्थानात अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडल्याने सर्वांनाच हे वयोवृद्ध जोडपे पालक बनल्याचे कौतुक आहे.
गोपीचंद आहेत माजी सैनिक
वयाच्या ७० व्या वर्षी मुलाला जन्म देणाऱ्या या मातेचे नाव आहे, चंद्रावती, तर ७५ वर्षीय पित्याचे नाव आहे गोपीचंद.
गोपीचंद हे झुंझुनू येथील नुहनिया गावातील माजी सैनिक आहेत. त्यांना निवृत्त होऊन ४० वर्षे झाली आहेत. बांगलादेश विरुद्धच्या युद्धामध्ये त्यांच्या पायात गोळी लागली होती. या वयोवृद्ध दाम्पत्याने जन्म दिलेल्या बाळाची प्रकृती उत्तम असून त्याची मातेची तब्येतही उत्तम आहे.तसेच या मुलाचे वजन सुमारे ३.५ किलो इतके आहे.
अशा प्रकारे वृद्ध वयात मुलांचा जन्म होण्याची उदारहणे सहाजिकच देशात अगदी थोडीच आहेत. राजस्थानात मात्र अशा वयात मुल जन्माला घालण्याचे हे पहिलेच उदारहण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान गोपीचंद सिंह यांनी मुलाच्या जन्मानंतर आनंद व्यक्त केला आहे. गोपीचंद हे त्यांच्या घरातील एकुलते एक मुल होते. त्यामुळे आता त्यांना मुलगा झाल्यामुळे त्याचे कुटुंबाची वंशवेल आता पुढे सरकेल याचा आपल्याला आनंद असल्याचा ते म्हणाले.
एका आयव्हीएफ सेंटरमुळे झाले शक्य
गोपीचंद सिंह यांनी दीडेक वर्षापूर्वी एका आयव्हीएफ सेंटरला भेट दिली. त्यानंतर उपाचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी चंद्रावती या गरोदर राहिल्या. मात्र, आपण वयोवृद्ध असल्याची चिंताही त्यांना सतावत होती. आता मात्र मुलाचा सुखरूप जन्म झाल्यामुळे त्या अतिशय आनंदी आहेत.