पुणे: मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यातील शिरूर येथे भाजपचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना भेटण्यासाठी ते निघाले असताना शिक्रापूर येथे चव्हाण कुटुंबियांच्या महिलांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं औक्षण केलं. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पाहतो, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रातून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. त्यामुळे भावी पंतप्रधान म्हणून तुम्हाला ओवाळतोय, असं म्हणत महिलांनी फडणवीसांना ओवाळलं. विशेष म्हणजे यावर फडणवीस काहीच बोलले नाहीत. त्यांनी कोणताच प्रतिवाद केला नाही. त्यांनी हसत हसत चव्हाण कुटुंबातील महिलांनी केलेलं औक्षण स्वीकारलं.
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पूरग्रस्त गावात तापाची साथ; उपचारांसाठी डॉक्टर डोंग्याने पोहोचले
शिक्रापूर येथे देवेंद्र फडणवीस शिरूर दौऱ्यावर असताना ते शिक्रापूर येथे जेवणासाठी थांबले असताना त्यांना सुवासिनींनी ओवाळले. फडणवीस यांनी त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पादेखील मारल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, प्रदीप कंद हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिक्रापूरच्या चव्हाण कुटुंबीयांकडून त्यांच्यासाठी खास मासवडीचा बेत करण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी तावही मारला. घरातून निघताना फडणवीसांनी चव्हाण कुटुंबीयांचे आभारही मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here