asha worker travels with pregnant women in boat: प्रसुतीसाठी गर्भवतीला रूग्णालयात दाखल व्हायच होतं. मात्र पुराने दोन ठिकाणी मार्ग अडवला. अशा परिस्थितीत आशा वर्कर महिलेने धाडस दाखवले. गर्भवतीला सोबत घेत आशा वर्करने डोंग्याने मार्गातील दोन पूर पार केले अन ग्रामीण रूग्णालयात पोहोचवले.

 

aasha worker
आशा वर्करचा गर्भवतीसह डोंग्यातून प्रवास
चंद्रपूर: प्रसुतीसाठी गर्भवतीला रूग्णालयात दाखल व्हायच होतं. मात्र पुराने दोन ठिकाणी मार्ग अडवला. अशा परिस्थितीत आशा वर्कर महिलेने धाडस दाखवले. गर्भवतीला सोबत घेत आशा वर्करने डोंग्याने मार्गातील दोन पूर पार केले अन ग्रामीण रूग्णालयात पोहोचवले. संगीता ठाकूर असे या आशा वर्करचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील नवीन पोडसा येथील पिंकुताई सुनील सातपूते या गर्भवती होत्या. त्यांना प्रसुतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रूग्णालयात भरती व्हायचे होते. मात्र मार्गावरील दोन नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे मार्ग बंद आहेत. अशा स्थितीत सातपुते कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. गावातील आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्या मार्गदर्शनात पिंकुताईला आरोग्य मार्गदर्शन सुरू होते.
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पूरग्रस्त गावात तापाची साथ; उपचारांसाठी डॉक्टर डोंग्याने पोहोचले
आज कुठल्याही स्थितीत तिला ग्रामीण रूग्णालयात भरती होणे आवश्यक होते. अशा कठिण स्थितीत आशा वर्कर संगीता ठाकूर यांनी गर्भवतीला सोबत घेत डोंग्याने प्रवास सुरू केला. वेडगाव ते सकमुरपर्यंत डोंग्याने प्रवास करत त्या शेवटी गोंडपिपरीला पोहचल्या. तिथून महिलेला जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले. संगीता ठाकूर यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here