मिठाचा दर दोन घटकांच्या आधारे ठरतो. ब्राईन आणि एनर्जी यामुळे मिठाची किंमत निश्चित होते. सध्या ब्राईनची किंमत स्थिर आहे. पण एनर्जीचा दर वाढला आहे. त्याचा परिणाम नफ्यावर होत आहे. त्यामुळेच कंपनीनं दरवाढीची योजना आखली असल्याचं डिसुझा यांनी सांगितलं.
मिठाची किंमत किती वाढणार आणि ती कधीपर्यंत वाढणार याबद्दल डिसुझा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या टाटा मिठाच्या एका पॅकेटची किंमत २८ रुपये इतकी आहे. देशात सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड अशी मीठ उद्योगात टाटा नमकची ओळख आहे.
टाटा कंझ्युमरनं कालच पहिल्या तिमाहीतील कंपनीच्या नफ्यातोट्याची आकडेवारी जाहीर केली. जून तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढून २५५ कोटींवर गेला आहे. आता टाटा मिठाची किंमत वाढणार असल्यानं त्याची झळ ग्राहकांना बसणार आहे.