नांदेड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगत असून काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. नांदेडमध्येही शिवसेना नेत्यांकडून बंडखोरांना आक्रमक इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांना पोलिसांनी आठ दिवसासाठी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.

आगामी मंत्रिमंडळ विस्तार, निवडणूक आयोगात सुरू असेलली सुनावणी, सुप्रीम कोर्ट निकाल या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि खासदारांशी वाद होऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असे कारण देऊन पोलिसांनी प्रकाश मारावार आणि कोकाटे यांना नोटीस दिली आहे.

महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप-शिंदे गटाला धक्का, फक्त १८ जागा मिळणार, सर्व्हेचा धक्कादायक निकाल

बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडू अन् तोंडाला काळेही फासू, असं वक्तव्य सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केलं होतं. त्यामुळे प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांना १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात, शहरात राहण्यास आणि फिरण्यास, संपर्क करण्यास प्रतिबंध करणारी नोटीस पोलीस अधीक्षकांनी बजावली आहे. तसंच प्रतिबंध का करण्यात येऊ नये, याबाबत दोन दिवसांत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

चुकांवर पांघरूण घातले जाणार नाही; नवनियुक्त मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी टोचले कान

दरम्यान, प्रकाश मारावार आणि दत्ता पाटील कोकाटे यांना मागच्या आठवड्यात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसंच बंडखोर आमदाराविरोधात आंदोलन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here