फ्लोरिडा: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा FBIने माजी राष्ट्रपती यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर येत आहे. FBIने माजी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या घरावर अण्विक कागदपत्रे आणि अन्य गोष्टींच्या शोधासाठी टाकला होता. वॉशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने हा मोठा दावा केलाय.

FBIने नुकतेच ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील ‘मार ए लागो’ घरावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांनी १२ हून अधिक बॉक्स जप्त केले होते, ज्यात कागदपत्रे होती. इतक नाही तर द न्यूज वीकने FBIच्या सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार हे छापे अशा वेळी टाकण्यात आले होते जेव्हा ट्रम्प घरी नसतील. FBIच्या अधिकाऱ्यांचे असे मत होते की ट्रम्प जर असतील तर छापे यशस्वी होणार नाही. त्याच बरोबर ते या गोष्टीचा वापर राजकीय लाभ घेण्यासाठी करू शकतील, असे अधिकाऱ्यांना वाटत होते.

वाचा-

FBIकडून टाकण्यात आलेले हे छापे राष्ट्रपती कार्यालयातील कागदपत्रांशी संबंधित असल्याचे याआधी सांगण्यात आले होते. ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडताना ही कागदपत्रे फ्लोरिडा येथील घरी आणली होती. न्याय विभागाकडून ट्रम्प यांच्या विरुद्ध दोन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. पहिले प्रकरण २०२०च्या निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आहे. तर दुसरा प्रकरण कागदपत्रांशी संबंधित आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या प्रकरणी चौकशी समितीने फ्लोरिडा येथील ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली होती.

वाचा-

ट्रम्प काय म्हणाले…

FBIने टाकलेल्या छाप्यानंतर ट्रम्प यांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या अध्यक्षाबाबत याआधी असे कधीच झाला नाही. अधिकारांचा चुकीचा वापर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here