Mumbai Pune Railway Landslide | पुणे-जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. आहे. सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
मुंबई: पुणे-जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. आहे. सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री मंकी हिल ते ठाकूरवाडी यादरम्यान दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. ही दरड नेमकी किती मोठी आहे, याची अद्याप माहिती पुढे आलेली नाही. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील अप दिशेच्या ट्रॅकवर ही दरड कोसळली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याठिकाणी दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्याला सुरुवात झाली. परंतु, या भागात सध्या पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ही दरड हटवण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. या काळात मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक कोलमडण्याची चिन्हे आहेत. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिरानं धावत आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Like this:
Like Loading...