औरंगाबाद : लग्नाचा वाढदिवशी बाहेर फिरायला न आल्याने विभक्त राहणाऱ्या पतीने-पत्नीवर चाकूने हल्ला चढवीत जखमी केल्याची धक्कादायक घटना शहरातील चिकलठाणा परिसरात घडली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ सुरासे (रा. म्हाडा कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. राजेंद्रच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पहिल्या पत्नीपासून त्याना दोन मुले आहेत. दोन्ही मुले राजेंद्रकडे राहतात तर फिर्यादी महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. दारूचे व्यसन असल्याने गेल्या दोन ते अडीच वर्षापासून ती आई-वडिलांकडे चौधरी कॉलनी गल्ली नंबर २ येथे राहते. ९ ऑगस्ट रोजी राजेंद्र दारूच्या नशेत आई-वडिलांच्या घरी आला.

Weather Alert : राज्यावर ४ दिवस अस्मानी संकट, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट
आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपण बाहेर फिरायला जाऊ असे पत्नीला म्हणाला. मात्र, पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. आरोपीने पत्नीच्या आई व भावास पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने जवळील चाकूने पत्नीच्या हातावर पोटावर वार करून जखमी केले. आरडाओरड केल्याने राजेंद्र तेथून पसार झाला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी विवाहितेला रुग्णालयात हलविले. विवाहितेच्या फिर्यादीवरून राजेंद्र विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Jalna IT Raid: जालन्यात अजय देवगनच्या ‘रेड’ स्टाइल छापा; महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार, ३९० कोटी जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here