मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४ दिवसांसाठी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) राज्यात पुढचे चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोठी बातमी: मिठी नदीत दोन तरुण बुडाले, अग्निशमन दलाचे बचावकार्य, एकाचा मृतदेह सापडला
गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात संततधार सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले तुडूंब वाहू लागले आहेत. पुराचा फटका शेतीला तर बसलेला आहेच, मात्र सर्वसामान्यांचेही जनजीवन विस्कळित झाले आहे. नागपूर जिल्ह्यातही ७४ टक्के अतिरिक्त पर्जन्यमान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.

तुलनेने गुरूवारी शहर तसेच विदर्भात पावसाचा जोर काहीसा मंदावलेला होता. शुक्रवारी आणि शनिवारीसुद्धा विदर्भाला कोणत्याही प्रकारचा इशारा नसून विदर्भवासियांना बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, रविवार १४ ऑगस्टापासून मात्र विदर्भाला परत एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Jalna IT Raid: जालन्यात अजय देवगनच्या ‘रेड’ स्टाइल छापा; महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार, ३९० कोटी जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here