जिल्ह्यात सकाळी दोघांचे करोनासाठीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दोन्ही रुग्णांना मुंबईहून प्रवासाची पार्श्वभूमी आहे. त्यातील एक जण कणकवलीतील असून तो कुडाळमधील रुग्णाच्या संपर्कात आला होता तर दुसरा रुग्ण वैभववाडीचा आहे. जिल्ह्यात दुपारी आढळलेल्या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण कुडाळचे, दोन रुग्ण सावंतवाडीचे तर एक रुग्ण वैभववाडी तालुक्यातील आहे.
मुंबईहून जिल्ह्यात विविध गावांत आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोक आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यात आढळलेल्या बहुतांश रुग्णांचं कनेक्शन आढळून आलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात येत आहे.
करोना टेस्टिंग लॅबसाठी कोर्टात धाव
सिंधुदुर्गात करोना टेस्टिंग लॅब व्हावी, यासाठी आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार यांनी प्रशासनाला इशारा दिल्यानंतर आता हायकोर्टातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत माजी आमदार यांनी माहिती दिली. अखिल वस्त यांनी ही याचिका दाखल केली असल्याचे जठार यांनी सांगितले. करोना टेस्टिंग लॅबवरून जे राजकारण सुरू आहे ते संतापजनक आहे. सरकार टाळाटाळ करत आहे. सत्ताधारी कोकणच्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. यांच्या हॉस्पिटलमध्ये लॅब सुरू होऊ शकते. तिथे अत्याधुनिक सुविधा आहेत, पण पालकमंत्री उदय सामंत त्यात राजकारण आणू पहात आहेत, असा आरोप करताना लॅब कुठेही करा पण लवकरात लवकर ही लॅब सुरू व्हायला हवी. हा प्रश्न न सोडवल्यास आम्ही प्रशासनाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करू, असा इशारा जठार यांनी दिला.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines