nashik car accident, हसतं-खेळतं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं; भरधाव बोलेरो कारच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू – bolero car accident in panchvati 14-year-old student passed away
नाशिक : शहरात भरधाव वेगाने चारचाकी चालवण्याचे प्रकार वाढले असून कारने क्लासवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. १०) सायंकाळी झालेल्या या अपघातात १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. साई मोहन देशमुख (१४ रा. मखमलाबाद रोड) असे अपघातात मृत्यू झाालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पंचवटी परिसरातील जाणता राजा कॉलनीत हा अपघात घडला. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कारचालक संशयित सम्राट चंद्रकांत पगारे (वय २७, रा. नांदगाव) याला अटक करण्यात आली आहे. साई हा सायंकाळी क्लासला जाण्यासाठी सायकलवरून घरातून निघाला. क्लास संपल्यानंतर साई घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता लागली. त्यानंतर शोधाशोध केला असता साईचा अपघात झाल्याचे कुटुंबातील सदस्यांना कळाले. Pune : पुण्यात मध्यरात्री घडली थरारक घटना; नदीपात्रात वाहू लागली कार, असे वाचले ५ जणांचे प्राण
क्लास सुटल्यानंतर साई सायकलवरून घरी येत होता. त्यावेळी जाणता राज कॉलनीत पगारे हे भरधाव वेगाने कार घेऊन आले. कारची धडक बसल्याने साई सायकलवरून दूर फेकला गेला. यावेळी साईच्या डोक्याला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सायंकाळी उशिराने त्याची मृत्यूशी झुंज संपली. साईच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंब हादरलं आहे.