अमोल सराफ, बुलडाणा : बुलडाण्यातल्या डोणगाव इथून जाणाऱ्या औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्या परियांत रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेल्याचं लोकांना दिसलं. यानंतर ते उचलण्यासाठी अशी काही लगबग झाली की यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबवावी लागली.

सोन्याच्या मण्याची माहिती मिळाल्यावर प्रत्यकाची रस्त्याच्या कडेला पडलेले मणी पाहण्यासाठी नजर भिरभिरत होती. डोणगावमध्ये १० ऑगष्टला सकाळी ११ वाजता दरम्यान औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्या परियानंत मोटारसायकल स्वार, आजू बाजूचे दुकानदार, रस्त्याने जाणारे पदाचारी हे सोन्याच्या मण्यांचे लाभार्थी ठरले.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जालन्यातल्या ‘त्या’ कंपनीत बनतं तरी काय? झाला उलघडा, वाचा Inside Story
हा प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालला. सोन्याचे मणी सापडत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने त्रिगोनी परिसरातील लोकांनी इथे गर्दी करण्यास सुरूवात केली. रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकल स्वारांनीदेखील गाडी थांबवून मणी वेचने सुरू केले. या धावपळीला पाहता काहीकाळ महामार्गावरील वाहतूक सुद्धा थांबलेली होती.

VIDEO : बारामतीत महिलेला मारहाण करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल, ९ जणांवर गुन्हा दाखल
सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले. महिलेच्या गळ्यातून माळ तुटून मणी पडले असल्याची चर्चा सुरू होती तर कोणी म्हणालं की चोरट्यांनी पोलिसांच्या धाकाने सोन्याचे मणी फेकून दिले असतील. अशात मात्र, काहींनी मणी फोडून पाहिल्यावर ते सरळ फुटून तुकडे-तुकडे झाले. ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्यासारखे दिसणारे नकली होते, याची खात्री पटली. या घटनेनंतर सगळ्यांनाच हसू आले.

पृथ्वीनं जगाचं टेन्शन वाढवलं; शास्त्रज्ञांनाही उत्तर मिळेना, पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here