लग्न समारंभात वाद किंवा राडे होण्याच्या अनेक घटना घडतात. चीनमधील एका लग्नातील अशी एक घटना समोर आली आहे ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे. बिजिंग शहरात एका लग्नाला सुरूवात झाली. नेहमी प्रमाणे सर्व गोष्टी सुरू झाल्या खऱ्या पण त्याचा शेवट मात्र काही ठरल्या प्रमाणे झाला नाही. या कार्यक्रमाचा शेवट एका मोठ्या राड्यासह झाला.
भारतात लग्न समारंभात मुलगी किंवा मुलगा पळून गेल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. किंवा ज्याच्या सोबत लग्न ठरले होते त्याच्या ऐवजी दुसऱ्या सोबत लग्न झाल्याचे समोर आले आहे. मात्र चीनमध्ये जे झाले ते कदाचित कुठेच घडले नसेल. सर्व पाहूण्यांच्या समोर भर कार्यक्रमात नवरदेवाने होणाऱ्या पत्नीचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबतच्या अफेअरचा खुलासा केला.
वाचा-
नवरदेवाने सर्वांच्या समोर मोठ्या स्क्रीनवर भावी पत्नीचा एक व्हिडिओ प्ले केला. हा व्हिडिओपाहून सर्वांना एकच धक्का बसला. कारण संबंधित भावी पत्नीचे तिच्या दाजींसोबत अफेअर होते. जो व्हिडिओ प्ले करण्यात आला तो दोघांच्या सेक्सचा होता.
या धक्कादायक खुलाशानंतर सर्व पाहुणे हैराण झाले. व्हिडिओ पाहून वधू देखील घाबरली. तिने बुके नवदेवाला फेकून मारला. तुला काय वाटले मला या गोष्टीबद्दल माहिती असणार नाही? न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित घटनेचा व्हिडिओ २०१९ साली सर्व प्रथम टिकटॉकवर शेअर झाला होता.
वाचा-
एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला…
जगभर चर्चेत आलेल्या या व्हिडिओच्या क्लिपला १ कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय. युझर्स यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. एशिया वनने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित जे दोघे लग्न करणार होते ते दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.