मुंबई: करण जोहर च्या या शोच्या ७ व्या सीझनची धमाल सुरू आहे. गेल्या महिन्याभरात या शोमध्ये आलेल्या पाहुण्या सेलिब्रिटींनी धमाल तर केली आहेच पण कधी स्वत:च्या आयुष्याबद्दल तर कधी इतरांच्या आयुष्यातील रहस्य उघड करत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. आता हा शो चर्चेत आलाय तो यांच्यातील गप्पांमुळं.

सोनम आणि अर्जुन यांनी या शोमध्ये धम्माल गप्पा मारल्या. काही मोठे खुलासेही केले. परंतु सर्वात जास्त भाव खाऊन गेली ती सोनम कपूर. सोनमला बॉलिवूडमध्ये काय सुरू आहे काय नाही… याचा काही पत्ताच नव्हता. सध्या चर्चेत असलेल्या चित्रपटांची नावंही तिला माहित नव्हती. बोलता बोलता सोनमनं सेलिब्रिटींचीच पोलखोल केल्याचं पाहयाला मिळालं.

आजकाल मोठ्या पुरस्कारसोहळ्यांसाठी सेलिब्रिटी महागडे आणि बड्या ब्रॅंडचे डिझायनर कपडे घालताना दिसतात. हजारो नव्हे तर लाखांमध्ये याची किंमत असते. याकपड्यांबद्दल सोनमनं खुलासा केलाय. सेलिब्रिटी त्यांच्या या खास कपड्यांमधील लूकचं फोटोशूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. हा ट्रेंड सोनमनं सुरू केल्याचं करण जोहरनं म्हटलं. यावर बोलताना ती म्हणाली की, आम्ही या अवॉर्डशोमध्ये जातो तेव्हा डिझायनर कपडे घालतो. अनेकदा ते भाड्यानं घेतलेलेही असतात, किंवा ब्रॅंड्स स्वत:हून देतात. असं असल्यानं त्यांनाही प्रसिद्धी मिळाली म्हणून रियानं आणि मी हे फोटोशूट करायचं ठरवलं होतं. यावर करणनं सोनमला तू विकत घेत नाहीस का? असं खोचक प्रश्नही विचारला. यावर हसत हसत सोनम म्हणते की, नेहमीच कपड्यांवर इतका खर्च करायला वेड नाही लागलंय.

दरम्यान, सोनमचं हे बोलणं सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

भावांबद्दल काय म्हणाली सोनम?करणनं जेव्हा सोनमला विचारलं की तुझे भाऊ कसे आहेत तेव्हा सोनम म्हणाली की, ‘मी यावर चर्चाच होऊ शकत नाही इतके माझे सगळे भाऊ करामती, उचापती आहेत. त्यात अर्जुन कपूरही मागे नाही.’ यावर मात्र अर्जुन म्हणाला, ‘हे काय बोलतेय. मला तर असं वाटतंय की सोनमकडून ट्रोल करून घ्यायलाच मला या शोमध्ये करणने बोलवलं आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here