सांगली : दारू दिली नाही म्हणून एका पारधी कुटुंबाचं घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जत तालुक्यातील शेड्याळ या ठिकाणी घडला आहे. गावगुंडांनी मिळून तिघा भावांना जबर मारहाण देखील केली आहे. ज्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये पारधी कुटुंबीयांच्या घराची तोडफोड करून घर आणि दुचाकी पेटवण्यात आले आहेत.

जत तालुक्यातल्या शेड्याळ या ठिकाणी एका पारधी कुटुंबाच्या घरावर गावगुंडांनी हल्ला करत घराची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर तिघा पारधी भावांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर गावगुंडांनी पारधी कुटुंबीयांचे घर आणि दुचाकी पेटवून दिली आहे. या घटनेमध्ये सुरेश चव्हाण, बादल चव्हाण आणि आकाश चव्हाण या तिघा भावांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ज्यामध्ये आकाश आणि बादल चव्हाण हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीतल्या भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक! नवविवाहित महिला पोलिसाचा गळफास, पुण्याच्या हॉटेलमध्ये मृतदेह आढळला
या प्रकरणी मेजर चंद्रकांत गुगवाड, माजी सरपंच अशोक पाटील, सुरेश देवर्षी अशा १० जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तिघं जणांना अटक करण्यात आली आहे. गावातील पारधी कुटुंबातल्या चव्हाण यांच्या घरी जाऊन मेजर गुगवाड, सुरेश देवर्षी यांनी दारूची मागणी केली. त्यानंतर घरामध्ये वडिलांसाठी आणलेली एक दारुची बाटली चव्हाण यांनी दिली. मात्र, आणखी दारूची मागणी चव्हाण बंधूंकडे करण्यात आली. मात्र, आता दारू नसल्याने देण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार केल्याची फिर्याद जत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे.

सोलापुरात MIM ला खिंडार; सात माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here