उर्वशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटर ऋषभ पंतने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. यावर आता अभिनेत्रीचं उत्तर आलं आहे. ऋषभने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता म्हटले होते- ‘माझा पाठलाग करणं सोड बहीण.’ यावर उर्वशी रौतेलाने एका पोस्टद्वारे ऋषभला जशास तसं उत्तर दिलं आहे. उर्वशीने लिहिले की, ‘छोटू भैयाने बॅट बॉल खेळावा. प्रिय मुला मी काही मुन्नी नाही जी तुझ्यासाठी बदनाम होईल. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.’

या सगळ्यात आता ऋषभचा १६ जानेवारी २०१९ चा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याचा थेट संबंध उर्वशीशी लावला जात आहे. ऋषभने एका मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला क्रिकेटपटूने लिहिले की, ‘मला फक्त तुला आनंदी ठेवायचे आहे, कारण तुझ्यामुळे मी खूप आनंदी आहे.’ काही वेळातच हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेला. जगासमोर ऋषभने त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं.
अखेर राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीवर अखेर बोलली मुलगी अंतरा
२०१९ मध्येच ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची बातमी आली. मात्र उर्वशीने ऋषभसोबतच्या नात्याला मैत्रीचे नाव देत हे वृत्त खोटे ठरवले होते. त्याचवेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतने उर्वशीला ईशा नेगीसाठी ब्लॉक केल्याचंही बोललं जात होतं.

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीला आज कोणत्याही विशेष ओळख राहिलेली नाही. ती अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावरही उपस्थित असते. आयपीएल २०२२ मध्येही दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांना ईशा मैदानावर दिसली होती. ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ऋषभला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार केल्यानंतर ईशाने इन्स्टाग्रामवर त्याचे अभिनंदन केले होते.
ईशाच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, ती एक उद्योजिका आणि इंटेरिअर डिझायनर आहे. मात्र, ती ऋषभ पंतला कधी आणि कशी भेटली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. ईशाने एमिटी युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. ती मूळची उत्तराखंडची आहे. विशेष म्हणजे ऋषभही उत्तराखंडचा आहे.
पुण्यातील अभिनेत्री आर्या घारेने स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस; म्हणाली…