११ ऑगस्ट रोजी मालवीय नगर भागातील बेगमपूर येथील किल्ल्यात २२ वर्षीय मयंक आपल्या मित्रासोबत बसला होता. त्यानंतर मयंक बद्दल ४-५ अज्ञात लोकांशी वाद झाला. मयंक आणि त्याच्या मित्रावर ४-५ मुलांनी दगडफेक केली. मयंक आणि त्याचा मित्र जीव वाचवून किल्ल्यावरून पळाले. आरोपींनी मयंकचा किल्ल्यावरून पाठलाग केला. मालवीय नगर परिसरातील डीडीए मार्केटमध्ये तो पोहोचला आणि त्यानंतर मयंकला घेराव घालून गजबजलेल्या परिसरातच धारदार चाकूने हल्ला केला. आरोपी टोळके मयंकवर चाकूने सपासप वार करताना बाकीचे लोक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
मयंकच्या मित्राने रस्स्यावरील लोकांच्या मदतीने मयंकला जखमी अवस्थेत एम्समध्ये दाखल केले. तेथे उपाचारादरम्यान त्याच मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबीय पोलिसांवर गंभीर आरोप करत आहेत. मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे मात्र शवविच्छेदन होत नाही. तपास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. तो त्याच्या वैयक्तिक कामात आणि फक्त कागदोपत्री कामात व्यस्त आहे. या प्रकरणी कोणाला अटक झाली की नाही, याची माहितीही दिली जात नाही किंवा घटनेबाबत काहीही सांगतिलं नाहीये, असा आरोपही मयंकच्या कुटुंबीयांनी केला आहे.