भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. उत्तर प्रदेश एटीएसनं मोहम्मद नदीमकडून एक मोबाईल फोन, दोन सीमकार्ड आणि विविध प्रकारची स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण साहित्य जप्त केल्याची माहिती दिली आहे. प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नदीम जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबानकडून प्रभावित होऊन आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या प्राथमिक पाहणीत त्याचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांशी मेसेच आणि वॉईस मेसेज देखील आढळले आहेत.
शिंदे कॅबिनेटमधील १३ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे, ८ जणांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत
मोबाईलमध्ये पुरावे आढळले
मोहम्मद नदीम हा व्हाटसअप, टेलिग्राम, मेसेंजर आणि क्लब हाऊसच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता, अशी माहिती एटीएसनं दिली आहे. नदीमनं ३० हून अधिक दहशतवाद्यांना आभासी क्रमांक आणि सोशल मीडिया अकाऊंट बनवून दिल्याची धक्कादायक माहिती एटीएसनं दिली. टीटीपी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी नदीमला आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण दिल्याची बाब देखील तपासात समोर आली आहे.
“… तर नवं सेना भवनही बांधतील”, जयंत पाटलांचं एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र
नुपूर शर्मांच्या घातपाताचं लक्ष्य
एटीएसनं केलेल्या चौकशीत मोहम्मद नदीमनं जैश-ए-मोहम्मद नुपूर शर्मांच्या घातपाताचं लक्ष्य देण्यात आल्याची बाब कबूल केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसला एका आठवड्यात दुसऱ्यांदा मोठं यश मिळालं आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त ड्रोनचा वापर करुन पाहणी सुरु ठेवली आहे.