मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने उद्या रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लॉक अत्यावश्यक आहेत. ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार

मार्ग : अप आणि डाऊन धीमा

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम : ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

ट्विटरच्या डीपीवर उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणाले, शिरसाटांच्या मनात नेमकं काय?
हार्बर रेल्वे

स्थानक : कुर्ला-वाशी

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०

परिणाम : ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या धावणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १० ते संध्याकाळी ६पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे

स्थानक : मुंबई सेंट्रल ते माहीम

मार्ग : अप आणि डाऊन जलद

वेळ : मध्यरात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. नंदुरबार-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस अंधेरी स्थानकात रद्द करण्यात येणार आहे.

पाचशे रुपये वर्गणी देण्यास नकार, दुकानदाराला मारहाण, सात जणांवर गुन्हा; चौघांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here