नागपूर : कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. ही घटना काल शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेंट फ्रान्सिस डिसेल्स एसएफएस कॉलेजमध्ये घडली. शिवम मोरेश्वर कटरे (वय १९. रा. दाभा) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

शिवम हा एसएफएस कॉलेजमध्ये बीसीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. तो कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी आला होता. दुपारी ३च्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथून त्याने उडी घेतली. यामुळे कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली असून तो रक्त्याच्या थारोळ्यात पडला होता. डाव्या अंगावर पडल्याने त्याच्या शरीराच्या डाव्या भागाला बरीच दुखापत झाली. तसेच त्याच्या डोक्यालासुद्धा बराच मार लागला होता. त्याला जवळच असलेल्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुंबई आमचीच! महापालिका निवडणूक जिंकूच-शिवसेना भाजपचा दावा
शिवमचे वडील मोरेश्वर (वय ४६) हे इलेक्ट्रिक फिटिंगची काम करतात. त्याची आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ असून तो जी.एस. कॉलेजला इयत्ता बारावीला शिकतो. त्याचे प्रेमप्रकरण असल्याची किंवा त्याला कोणते व्यसन असल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे त्याने मानसिक तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही त्याच्यावरील तणावामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

बाबा मला माफ करा

त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले तेव्हा त्याचे वडिलांशी बोलणे झाल्याचे माहिती मिळाली आहे. यावेळी ‘बाबा मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. मात्र, आता मला जगायचे नाही’ असे तो वडिलांना बोलल्याचं सांगितलं जात आहे.

आत्महत्येपूर्वी पेट्रोल प्यायला होता

गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांनी दिली. तो एकटाच राहत असे. त्यातच त्याने मित्रांशीही बोलणे जवळपास बंद केले होते. त्याचा वर्ग कॉलेजच्या खालच्याच मजल्यावर असूनही तो तिसऱ्या मजल्यावर गेला. त्यामुळे त्याने आत्महत्येचा निश्चय केला होता, असे दिसून येते. आत्महत्या करण्यापूर्वी शिवमने पेट्रोल पिल्याचे समोर आले आहे. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने स्वत:च मित्राला ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच माझ्याने काहीच होणार नाही, मला मरायचे आहे, असे तो सतत बोलत होता.

गुणवत्तापूर्ण काम करा; नितीन गडकरींचा बिल्डरांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here