जळगाव : चोपडा शहरात प्रेम प्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तरुणीच्या १७ वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत प्रेमी युगलाची नावं आहेत. चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.

सच्चा शिवसैनिकासाठी धावले एकनाथ शिंदे, तातडीने धाडली २ लाखांची मदत
दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन भावासह दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत तरुणीचा संशयित अल्पवयीन भावानेच दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.

पळून जाण्याचा बेत होता, त्यापूर्वीच मुलीच्या भावाने घेतला जीव…

राकेश संजय राजपूत याचे वर्षा कोळी हिच्यावर प्रेम होते. राकेश-वर्षा हे दोघे शुक्रवारी रात्री पळून जाणार होते. याबाबतची माहिती वर्षाच्या लहान भावाला मिळाली. त्यानुसार त्याने बहिणीवर लक्ष ठेवले. त्यानंतर राकेश हा वर्षा हिच्या घरी आला असता, लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश याला तसेच वर्षा या दोघांना दुचाकीवर बसवून चोपडा ते वराडे रोडलगत असलेल्या नाल्याजवळ आणले. याठिकाणी वर्षा हिच्या भावाने राकेशच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जालन्यातल्या ‘त्या’ कंपनीत बनतं तरी काय? झाला उलघडा, वाचा Inside Story

यानंतर लहान भावाने बहिण वर्षाचा हिचा रुमालाने गळा दाबून तिचा जीव घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतले आहे. चोपडा शहरातील तरुण राहत असलेला रामपुरा तसेच तरुणी राहत असलेल्या सुंदरगढी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सोन्याच्या मण्यांचा पाऊस, महामार्ग थांबवून झाली तुफान गर्दी; एकाने अचानक फोडला मणी…

1 COMMENT

  1. I would like to thank you for the efforts you have put in penning this website. Im hoping to see the same high-grade content by you in the future as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own website now 😉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here