मुंबई : आठवड्या भरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात हवामान खात्याकडून पढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट देण्यात आला असून समुद्राला उधाण आल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून १४ ऑगस्टपर्यंत राज्याच्या किनार पट्टीवर ताशी ४५ ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. १४ ऑगस्टपर्यंत समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सच्चा शिवसैनिकासाठी धावले एकनाथ शिंदे, तातडीने धाडली २ लाखांची मदत
१५ ऑगस्टपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भाला दिलास पण या तारखेला मुसळधार

शनिवारी विदर्भाला कोणत्याही प्रकारचा इशारा नसून विदर्भवासियांना बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, रविवार १४ ऑगस्टापासून मात्र विदर्भाला परत एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

डिजेचं साहित्य आणण्यासाठी निघाले अन् वाटेत गायीने अडवलं, चौघांचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here