Pune News : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढले गावात सख्या भावाने आपल्या भावाची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडी ओंडके का टाकले अशी विचारणा केल्यावरून भावानेच भावाची हत्या केली.

 

Pune News
सख्खा भाऊ पक्का वैरी, बारामतीत क्षुल्लक कारणावरून धक्कादायक पाऊल उचललं

हायलाइट्स:

  • सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचा घाव घालून भावाची केली हत्या
  • क्षुल्लक वादावरून केली भावाची हत्या
  • पु्ण्यातील बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना
पुणे : बारामती तालुक्यातील मोढले गावात सख्या भावाने आपल्या भावाची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडी ओंडके का टाकले अशी विचारणा केल्यावरून भावानेच भावाची हत्या केली. तायाप्पा सोमा मोटे (वय ६० रा. मोढवे, मोटेवस्ती, ता.बारामती जि.पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मी महादेव मोटे (वय ३७ रा.मोढवे मोटेवस्ती ता.बारामती) यांच्या फिर्यादीवरून रामा सोमा मोटे (रा- मोढवे, मोटेवस्ती ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे सासरे तायाप्पा सोमा मोटे याने भाऊ रामा सोमा मोटे यास तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे. अशी विचारणा केल्याच्या कारणावरूनच रामा सोमा मोटे याने त्याचा भाऊ तायाप्पा मोटे याला शिवीगाळ दमदाटी करत तु या रस्त्याने जायचे नाही “तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला खल्लास करतो” असे म्हणून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने रामा मोटे याने तायाप्पा मोटे याच्या हातातील कु-हाड हिसकावून घेत असताना तायाप्पा मोटे खाली पडला.

मोदींचं आवाहन, विरोधकांचं टीकास्त्र, आरआरएससह मोहन भागवतांच्या ‘डीपी’वर अखेर तिरंगा
त्यावेळी रामा याने कुऱ्हाड हिसकावून घेऊन तायाप्पा मोटे याच्या डोक्यात मारत असताना ती कुऱ्हाड तायाप्पा मोटे यांनी हूकावल्याने त्यांच्या डोक्यात न लागता त्यांच्या डाव्या पायाला जोरात लागून गंभीर जखमी करुन जिवे ठार केले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली सदर घटनेचा पुढील तपास लांडे करीत आहेत.

आणखी एक क्लीनचीट! समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीचा निष्कर्ष

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here