शुक्रवारी (१२ ऑगस्ट) ‘नेटसर्फ’ परिवाराने त्यांच्या बाणेर येथील मुख्यालयात एकत्र येत त्यांच्या संपूर्ण इमारतीला बाहेरून हा तिरंगा लावला. या भव्य तिरंगा ध्वजाचे अनावरण राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नेटसर्फ नेटवर्कचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी एक आहे. या तिरंग्याने त्याच्या प्रत्येक साक्षीदाराच्या मनात आपल्या देशाबद्दलचे प्रेम आणि अभिमान पुन्हा नव्याने जागवला आहे. नेटसर्फ कंपनीनेही आपल्या गेल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या उद्योजकतेस प्रोत्साहन दिले आहे.
राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य
चंद्रकांत पाटील म्हणाले, “अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असून, भारतीयांच्या कल्पकतेने ‘हर घर तिरंगा’ या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो. इमारतीच्या भोवती सर्वात मोठा ध्वज लावल्याचा मला आनंद झाला.”
नेटसर्फ कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित जैन यांना विश्वास वाटतो की जर व्यक्तींना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले तर ते त्यांचा कौशल्य विकास करून स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकतात. त्यामुळेच या ७५व्या खास स्वातंत्र्य दिनाला संपूर्ण नेटसर्फ परिवार एकत्र येऊन ‘ख्वाबों की आझादी’ वरील दृढ विश्वास साजरा करत आहे, असे ‘नेटसर्फ’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन म्हणाले.