अमरावती : अमरावतीत गुन्हेगारांना भीतीच राहिली नाही, असंच म्हणावं लागेल. कारण, अमरावती शहरात आज एका लहान मुलीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
अहमद काही लोकांना घेऊन जुबेर खानवर हल्ला करण्यासाठी निघाला होता. जुबेर खान आणि अहमद यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली. तेव्हा जुबेर खानने आपल्याजवळ असलेल्या पिस्तूलमधून तीन फायर केले. त्यापैकी एक गोळी ही रस्त्याने जाणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला लागली. अहमद खानला जोरदार मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे.