मुंबई- रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमिर खान आणि करिना कपूर स्टारर फॅमिली ड्रामा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती. यासोबतच आता ते कायदेशीर लढाईत अडकल्याची माहितीही समोर आली आहे. एवढेच नाही तर चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा मीम्स सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ‘लाल सिंह चड्ढा’ बद्दलचे सर्व मजेशीर मीम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चला ट्विटरवरील मीम्सवर एक नजर टाकूया-

लाल सिंह चड्ढा वर बहिष्कार टाकण्यात करिना कपूरच्या वक्तव्यावरही यूजर्स मीम्स बनवताना दिसत आहेत. युझरने रिकाम्या चित्रपटगृहांचे छायाचित्रे शेअर करताना दिसत आहेत. लाल सिंह चड्ढा ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्या येत आहेत, युझर्स याचीही खिल्ली उडवताना दिसत आहेत.

लाल सिंह चड्ढा

लाल सिंह चड्ढा

आमिर खानचा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ हा ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करिना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यनेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अद्वैत चंदनने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘लाल सिंग चड्ढा’चे बजेट अंदाजे १८० कोटी रुपये आहे. तसेच तो ३ हजार ५५० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here