husband attacks wife with knife: चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्कायवॉकवर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

kalyan crime
पतीचा पत्नीवर चाकूनं हल्ला
कल्याण: चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्कायवॉकवर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या पती विकास पाटील याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे .

कल्याणजवळ आंबिवली येथे विकास पाटील आपल्या पत्नीसह राहत होता. काल रात्री कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवरून पती पत्नी जात होते. विकास प्रविणाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने विकास व प्रविणामध्ये नेहमीच भांडण व्हायचे. काल रात्री नऊ वाजता कल्याणच्या स्कायवॉकवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतापलेल्या विकासने प्रविणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रविणाच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर गंभीर दुखापत झाली आहे.
नडला अन् जिंकला! २० रुपयांसाठी रेल्वेशी पंगा; तब्बल २२ वर्षे लढला; आता दणकून भरपाई मिळणार
जखमी प्रविणाला कल्याणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रविणा जखमी झाल्याचे पाहून विकास तेथून पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विकासला अटक केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here