viral video of lady slapping e rickshaw driver: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेनं ई-रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. रिक्षा कारला घासल्यानं महिला संतापली आणि तिनं रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. भडकलेल्या महिलेनं ई-रिक्षा चालकाला रोखलं. त्याचं शर्ट धरून त्याला कारजवळ आणलं. त्यानंतर त्याला थोबाडीत लगावण्यास सुरुवात केली.

 

noida video
महिलेची रिक्षा चालकाला मारहाण
नोएडा: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेनं ई-रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. रिक्षा कारला घासल्यानं महिला संतापली आणि तिनं रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. भडकलेल्या महिलेनं ई-रिक्षा चालकाला रोखलं. त्याचं शर्ट धरून त्याला कारजवळ आणलं. त्यानंतर त्याला थोबाडीत लगावण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेनं रिक्षा चालकाला सर्वांसमोर मारहाण केली. दीड मिनिटांत तिनं चालकाला १७ वेळा थोबाडीत दिली. त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. मात्र कोणीही महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी ई-रिक्षा चालक काहीच न बोलता गुपचूप उभा होता. महिलेनं त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावला. ती भाजपच्या महिला मोर्चाची सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहीजणांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पतीची हत्या करून पत्नीनं घरातच मृतदेह गाडला; शेजाऱ्यांना संशय अन् चार दिवसांनंतर अचानक…
रिक्षा चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ई-रिक्षा चालकानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here