नागपूर : “चंद्रशेखर बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कर्तृ्त्वावाला वाव मिळणार आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आई मुलाचा पक्ष नाही. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने-कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे”, असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित समारंभाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, तसेच नागपूरचे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने केलेल्या भाषणात गडकरींनी तुफान फटकेबाजी केली. बावनकुळेंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली.

ऑटो रिक्षा चालवणारा माणूस राज्याचा अध्यक्ष झाला

“कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. एक झोकून देऊन काम करणारे तर दुसरे बोटाने मलम लावणारे… बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. त्यांना पुढे आमदारकीचं तिकीट मिळालं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना उर्जाखातं दिलं. तिथेही त्यांनी उत्तम काम केलं. मी जिथे जिथे जायचो तिथे बावनकुळेंच्या कामाची तारीफ व्हायची. त्यांनी उर्जा खात्यातील अनेक वर्षांचा बॅकलॉग भरुन काढला. बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसा त्यांच्या कर्तृ्त्वाला वाव मिळणार आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आई मुलाचा पक्ष नाही. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे”, असं गडकरी म्हणाले.

चर्चा प्रति शिवसेना भवनाची, खासदार शेवाळेंनी शिंदे गटाची पहिली शाखाही उघडली, शुभारंभ कुठे?
देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी

देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. आतापर्यंत राज्याचं अध्यक्षपद भूषविलेल्या व्यक्तीला पुढे काय काय मिळतं…. हे वेगळं सांगत नाही… त्यांचाही पुढे विचार होऊ शकतो, असं सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजेत… पण फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो, असं गडकरी म्हणाले. पुढे गडकरींनी मीडियावरही निशाणा साधला. “मीडियाची अडचण अशी आहे की जे बोललो नाही ते छापतात… नाहीतर उद्या छापतील ‘फडणवीस को गडकरी का सूचक संदेश’…..हिम्मत असेल तर तुमच्या नावाने छापा ना… माझ्या नावावर का म्हणून…”, असंही मिश्किलपणे गडकरी म्हणाले.

कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी संजय पवारांना ताब्यात घेतलं, कार्यकर्ते गाडीपुढे आडवे
तरुण कार्यकर्त्यांनो बावनकुळेंनी बायको पळवून आणली होती…

सगळ्यांकरिता आनंदाची गोष्ट आहे की आपल्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता आज पक्षाचा अध्यक्ष झालाय. मी नेहमी म्हणतो की आपली पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इथे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान पैदा होत नाही. बावनकुळे रिक्षा चालवायचे. त्यांनी बायकोही पळवून आणली. ते तेली समाजाचे, त्यांची बायको कुणबी समाजाची… आता बाकी काय सांगत नाही. ते बाकीचं तुम्हाला खासगीत सांगतील.. तरुण कार्यकर्त्यांना हे उपयोगी पडेल.. ज्येष्ठ नेत्यांनी या भानगडीत पडू नये…. असे हास्याचे कारंजे गडकरींनी उडवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here