पुण्यातील मतदारसंघानुसार आढावा बैठक घेत असताना अमित ठाकरे यांनी कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाल्यानंतर पुण्यातील ढोलताशा पथकांच्या सरावाची पाहणी केली. पुण्यातील नूमवि शाळेतील ढोल पथकाला अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांना ढोल वादनाचा मोह आवरता आला नाही. अमित ठाकरेंनी कमरेला ढोल बांधत एकच ताल धरत तब्बल १५ मिनिटे ढोल वादन केले.
अमित ठाकरे पुण्यातील ८ आणि शिरूर मधील ५ मतदारसंघात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. तसेच तिथल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. १२ ऑगस्टला अमित यांनी कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा केला असून आज १३ तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि १४ ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेड मध्ये दौरा असणार आहे.