गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मेहसाण्यात तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत एक गाय अचानक शिरली. तिनं पटेल यांच्यासह काही जणांना धडक दिली. पटेल यांच्यासह यात्रेत सहभागी झालेले काही जण गायीच्या धडकेमुळे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

patel deputy cm
माजी उपमुख्यमंत्र्यांना गायीची धडक
अहमदाबाद: देशभरात आझादी का अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवलं जात आहे. मोदींच्या आवाहनाला कोट्यवधी भारतीयांना प्रतिसाद दिला आहे. गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मेहसाण्यात तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत एक गाय अचानक शिरली. तिनं पटेल यांच्यासह काही जणांना धडक दिली. पटेल यांच्यासह यात्रेत सहभागी झालेले काही जण गायीच्या धडकेमुळे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मेहसाणा जिल्ह्यातील काडी शहरात पटेल यांनी तिरंगा यात्रा काढली होती. त्यात अचानक एक गाय शिरली. गायीनं पटेल यांना धडक दिली. त्यामुळे पटेल यांना दुखापत झाली. त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं. तिरंगा यात्रेत जवळपास २ हजार जण सहभागी झाले होते, अशी माहिती पटेल यांनी दिली. यात्रा ७० टक्के अंतर कापून भाजी मंडईत पोहोचली. त्यावेळी एक गाय अचानक यात्रेत घुसली, असं पटेल यांनी सांगितलं.

गायीची धडक बसताच पटेल आणि काहीजण जमिनीवर पडले. घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात पटेल हातात तिरंगा धरून चालताना दिसत आहेत. त्यांच्या आसपास अनेक जण आहेत. तितक्यात गाय अचानक यात्रेत शिरली. तिनं पटेल यांच्यासह काहींना धडक दिली.
कार तुझ्या बापाची आहे का? महिलेनं ९० सेकंदांत रिक्षावाल्याला १७ वेळा थोबाडीत मारली
पटेल यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांचा एक्सरे आणि सीटी स्कॅन करण्यात आला. त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याचं एक्सरेमधून समजलं. डॉक्टरांनी पटेल यांना २० ते २५ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here