Bhandardara Weekend Place To Visit: सुट्यांमध्ये निसर्ग पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल, तर भंडारदरा (Bhandardara) हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये, प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं हे हिल स्टेशन आहे. भंडारदरा धरण तुडुंब भरलं असून परिसरातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत. लाँग वीकेंडला कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हा परफेक्ट स्पॉट ठरू शकतो. मुंबई-पुण्याच्या गजबजाटातून शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर इथे भेट देऊ शकता. मुंबई-पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी तुमचा वीकेंड घालवू शकता. भंडारदरा धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे अशा गोष्टी इथे पाहता येतील. लाँग वीकेंड लक्षात घेता, येथील प्रशासनानेही विशेष खबरदारी घेतली आहे.

भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारं भंडारदरा धरण तुडूंब भरलं आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची गरज भंडारदरा धरण भागवतं. दरवर्षी १५ ऑगस्टला हे धरण ओव्हरफ्लो होतं. यावर्षी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरण तुडूंब भरलं आहे. स्पिलवे गेटजवळील भिंतीवरून धरणातील पाणी उसळ्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदरा धरण परिसरात येत आहेत.

एकेरी वाहतुक सुरू

विकेंडसह जोडून आलेल्या सुट्यांमुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान एकेरी वाहतुक सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भंडारदरा आणि शेंडी येथे जाण्यासाठी वाकी फाटा तसंच वारंघुशी फाटा येथून प्रवेश सुरू राहिल. तर परतीचा मार्ग हा शेंडी येथून भंडारदरा धरण ते स्पिलवे गेट, तिथूव गुहिरे गाव ते रंधा मार्गे असणार आहे. हेही वाचा – Pune Weekend Getaways: पुण्याजवळची ही ठिकाणं ठरतील तुमच्यासाठी या लाँग वीकेंडला परफेक्ट स्पॉट

परफेक्ट वीकेंड स्पॉट

मुंबईपासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही इथे सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. भंडारदरा (Bhandardara) मुंबईपासून जवळपास १६५ किलोमीटरवर आहे. तर पुण्यापासून भंडारदरा जवळपास १७२ किमीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये (Sahyadri) वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी भंडारदरा धरण, विल्सन डॅम, आर्थर लेक, अंब्रेला फॉल्स अशी आकर्षणं आहेत. भातशेती, धबधबे, तलाव, धरणं, डोंगर-टेकड्यांमुळे ट्रेकर्ससाठीही वीकेंड घालवण्यासाठीची परफेक्ट ठिकाण (Weekend Spot Near Mumbai Pune) ठरू शकतं. हेही वाचा – Long Weekend Destinations: काय झाडी, काय डोंगार… लाँग वीकेंडसाठी मुंबईजवळ आहेत हे ओक्के स्पॉट

ट्रेकिंग

पश्चिम घाटातील इगतपुरीजवळ भंडारदरा ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठीही उत्तम स्पॉट आहे. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदरा आहे. अहमदनगरपासून हे १५५ किमीवर आहे. रतनगड, कळसूबाई, हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी जाता येऊ शकतं. तसंच प्राचीन अमृतेश्वर शिव मंदिरलाही तुम्ही भेट देऊ शकता. रतनवाडी गाव, राधा धबधबा, अगस्ति देवस्थान ही ठिकाणं भंडारदरामध्ये पाहता येतील. भंडारदरामध्ये आर्थर लेक लोकप्रिय आहे. इथे कॅम्पिंग, बोटिंग, फोटोग्राफीसाठी भेट देऊ शकता.

भंडारदऱ्यात दमदार पाऊस

भंडारदरा (Weekend Place To Visit) भागात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण (Bhandardara Dam Overflow) ओव्हरफ्लो झालं आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला हे धरण ओव्हरफ्लो होतं. अहमदनगरमधली (Ahmednagar) भंडारदरा, निळवंडे, मुळा धरण चांगली भरली आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here