वेगळ्या धाटणीची ही मालिका संपत असल्याने प्रेक्षकांनी तर दु:ख व्यक्त केलंच आहे, पण त्याचबरोबर मालिकेतील कलाकारही भावुक झाले आहे. या मालिकेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच कलाकारांनी त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिनेदेखील सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे वाचा-विठू माऊलीनंतर आता ‘टकाटक २’ का? अजिंक्य राऊतने सांगितलं कारण
अभिनेत्रीने इंद्रा आणि दीपू यांच्या एका रोमँटिक क्षणाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यावेळी ती म्हणतेय की, ‘या संधीसाठी मी झी मराठीची कायम कृतज्ञ असेन. माझ्यातील काहीसा भाग मागे ठेवत आहे, पण काही सर्वोत्तम माणसांसोबतच्या अनेक आठवणी माझ्यासह घेऊन जातेय.’ तिने मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी, तिचा ‘इंद्रा’ अजिंक्य राऊत यांच्यासह मालिकेतील सर्वच सहकलाकारांचे ‘मन उडू उडू झालं’ सर्वात संस्मरणीय बनवण्यासाठी आभार मानले आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

याशिवाय मालिकेतील इतर कलाकार रीना मधुकर, ऋतुराज फडके, श्रावणी कुलकर्णी, अजिंक्य यांनीही पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेचे विविध फॅनपेज देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या मालिकेच्या संपूर्ण स्टार कास्टला मिस करू अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.
हे वाचा-सुमित राघवनचा संताप-‘हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी; मराठीला सावत्र वागणूक’
या मालिकेतील शेवटच्या एपिसोडमध्ये कार्तिक-सानिकाला त्यांची चूक कळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांनी इंद्रा-दीपूची माफी मागितल्यानंतर आता या जोडीचा सुखी संसार सुरू झाला आहे. एकंदरित इंद्रा-दीपूच्या फिल्मी लव्ह स्टोरीचा ‘THE END’ गोड दाखवण्यात आला आहे. आता या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना सोमवार १५ ऑगस्टपासून नवी मालिका पाहता येणार आहे. दीपा परब, धनश्री कोडगावकर स्टारर ‘तू चाल पुढं’ ही मालिका ‘मन उडू उडू झालं’च्या वेळेत दाखवली जाईल.