चेन्नई: चेन्नई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ प्रजातीचे २३ प्राणी जप्त केले आहेत. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी ११ ऑगस्टला बँकॉकहून आला होता. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रवाशाला रोखलं. त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आली. त्या बॅगेत अनेक प्राणी आढळून आले.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांना बॅगमध्ये १ डिब्रेजा माकड, १५ किंग साप, ५ बॉल अजगर आणि २ एल्डब्रा कासवं सापडली. या जिवंत प्राण्यांना अवैधरित्या आयात करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्राण्यांना एक्यूसीएसच्या सल्ल्यानं थाय एअरवेजनं त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आलं. प्राण्यांना अवैधरित्या घेऊन आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.
कार तुझ्या बापाची आहे का? महिलेनं ९० सेकंदांत रिक्षावाल्याला १७ वेळा थोबाडीत मारली
बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर २९ जूनला दोन भारतीय महिलांना १०९ जिवंत प्राण्यांची तस्करी करताना अटक झाली होती. थायलंडच्या राष्ट्रीय उद्यान वन्यजीव आणि वनस्पती संरक्षण विभागाला दोन सुटकेसमध्ये २ पांढरी साळींदरं, २ खवले मांजर, ३५ कासवं, ५० पाली आणि २० साप सापडले होते.
पतीची हत्या करून पत्नीनं घरातच मृतदेह गाडला; शेजाऱ्यांना संशय अन् चार दिवसांनंतर अचानक…
वन्यजीव व्यापाराची देखरेख करणाऱ्या TRAFFIC एजन्सीनं दिलेल्या अहवालानुसार, २०११ ते २०२० दरम्यान भारतातील विमानतळांवर प्राणी जप्त करण्यात आल्याच्या १४० कारवाया झाल्या. या कारवायांमध्ये ७० हजारांहून अधिक देशी आणि परदेशी प्राणी जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here