‘संघाचे मालकदेखील बारमध्ये उपस्थित होते. त्यापैकी एक जण माझ्याशी बोलत होता. शून्यावर बाद होण्यासाठी आम्ही तुला एक मिलियन डॉलर दिलेले नाहीत, असं मालक म्हणाला आणि त्यानंतर त्यानं माझ्या थोबाडीत ३-४ लगावल्या. ते हसत होते आणि त्यांनी कानशिलात फार जोरात मारलं नव्हतं. मात्र ते खोटं खोटं मारत आहेत यावर मला विश्वास नव्हता. त्यावेळची परिस्थिती पाहता मला याचा बाऊ करायचा नव्हता. मात्र व्यवसायिक खेळाच्या वातावरणात असं काही होऊ शकतं याची मी कल्पनाही केली नव्हती,’ असं टेलरनं आत्मचरित्रात म्हटलं आहे.
रॉस टेलर २००८ ते २०१० या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळला. २०११ मध्ये राजस्थान रॉयल्स संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्सचंदेखील प्रतिनिधीत्व केलं आहे. रॉस टेलर त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ५५ सामने खेळला आहे. त्यात त्यानं ३ अर्धशतकं साकारली आहेत. त्याच्या नावावर १ हजार १७ धावा आहेत.