Vinayak Mete Death : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

vinayak mete accident news
विनायक मेटे अपघात
नवी मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या मेटे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here