मराठा आरक्षणात महत्त्वाची भूमिका

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून विनायक मेटे सक्रिय होते. शिवसंग्राम पक्षाचे मेटे हे प्रमुख होते. तसंच, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही मेटेंची भूमिका महत्त्वाची होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं केली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे ही सलग पाच टर्म विधानपरिषदेवर आमदार होते.
सलग पाच टर्म आमदार

१९९५ सालापासून अपवाद वगळता विनायक मेटे विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहे. २७ वर्षांच्या कार्यकाळात २५ वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत उतरले. त्यानंतर सर्वप्रथम भाजप-युती सरकारच्या काळात ते आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.
शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादीत विलीन

१९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन युतीला पाठींबा दिला होता. सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांना धाडण्यात आले. त्यानंतर त्यांचे युतीशी बिनसले आणि त्यांचा महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादीत विलिन झाला. राष्ट्रवादीनेही त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली होती.
पक्षांतरानंतरही संधी

२०१४साली त्यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत विलीन केला. भाजपला पाठिंबा दिलेल्या मेटेना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. तसंच, पक्षांतर केल्यामुळं त्यांची आमदारकीची अर्धी टर्मही भाजपने त्यांना दिली. त्यानंतर पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाण्याची संधी भाजपने विनायक मेटे यांना दिली.