राकेश झुनझुनवाला किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मात्र, त्यांनी शेअर मार्केटमधील आपलं वर्चस्व कधीच कमी होऊ दिलं नाही. राकेश झुनझुनवाला हे नाव कायमच चर्चेत होत. बाजार त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असायचा. सर्व विश्लेषक त्यांची रणनीती समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. एप्रिल-जूनमध्ये बाजारात बरीच अस्थिरता होती. तेव्हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कमी-अधिक प्रमाणात कोणताही बदल झालेला दिसला नाही. शेअर मार्केटमध्ये लोकांचे लाखो रुपये बुडायचे पण झुनझुनवाला कोट्यवधी कमवायचे. म्हणूनच त्यांना शेअर मार्केटमधील बादशाह म्हटलं जायचे.
Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक
राकेश झुनझुनवाला हे भारताचे वाॅरेन बफेट म्हणूनही ओळखले जायचे. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर झुनझुनवाला यांनी एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि ७ ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू झालं होतं. काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी Akasa नावाने एअरलाइन कंपनी उघडली. प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत होते. या विमान कंपनीला नागरी उड्डान मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालं होतं. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. Akasa एअरलाइन्स सुरू करण्याआधी त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची Akasa एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी आहे. दोन्हींचा एकत्रित वाटा ४५.९७ टक्के आहे. विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भटकुली, पीएआर कॅपिटल वेंचर्स, कार्तिक वर्मा देखील यात प्रमोटर आहेत. झुनझुनवाला यांच्यानंतर विनय दुबे यांचा सर्वाधिक म्हणजेच १६.१३ टक्के वाटा आहे. ही कंपनी चालवण्याची जबाबदारी विनय दुबे यांच्यावर असून ते या कंपनीचे सीईओ आहेत.
झुनझुनवाला यांच्या Akasa एअरचे मुख्य प्रतिस्पर्धी इंडिगो आणि टाटा समूहाचे एयरलायन्स हे आहेत. एअर इंडियाच्या विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि टाटा समुहाची ८० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे.
सलग पाच टर्म आमदार ते मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज; असा होता विनायक मेटेंचा राजकीय प्रवास