कॉफी विथ करण असं या शोचं नाव असल्याने सेटवर कॉफीचे वाफाळते कप ठेवले जातात. गप्पा गोष्टी, खेळ खेळताना करण आणि सेलिब्रिटी अधून मधून टेबलावरचा मग ओठाला लावतात. पण मुळात त्या कॉफीच्या मगमध्ये कुठली कॉफी असते? या शोमधील चर्चेतला रॅपिड फायर राउंड जिंकणाऱ्या सेलिब्रिटी पाहुण्याला गिफ्ट हँपर दिलं जातं, त्यात काय गिफ्ट असतात? हे प्रश्न न पडणारा प्रेक्षक असूच शकत नाही. कॉफी मग मध्ये खरंतर कॉफी नसतेच. गिफ्ट हँपरमध्ये तर सात लाखांपर्यंतच्या किंमती वस्तू असतात. होय हे खरं आहे. अशाच काही रंजक आणि माहीत नसलेल्या गोष्टी कॉफी विथ करण शोच्या बॅकस्टेज होत असतात.
हे वाचा-राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट आले समोर, काय म्हणाले डॉक्टर?
कॉफी विथ करण शोचा पहिला एपिसोड रिलीज झाला १९ नोव्हेंबर २००४ ला. या शोमध्ये बॉलिवूडची हिट जोडी शाहरूख खान आणि काजोल यांनी हजेरी लावली होती. तर पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड अमिताभ बच्चन यांनी केला होता. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे टॉक शोच्या स्पर्धेतील हा दुसरा लोकप्रिय शो ठरला आहे.

कॉफी विथ करण शोमध्ये जो कॉफी मग असतो त्यातून एकही सेलिब्रिटी कॉफी पितच नाही. दिसायला हा कॉफी मग असतो पण त्यामध्ये कलाकारांच्या आवडीप्रमाणे पेय दिलं जातं. करणच्या कॉफी मगमध्येही त्याच्या आवडीचं पेय असतं.
हे वाचा-बिग बॉस मराठीचं नवं घर, नवे खेळाडू तर मग होस्ट? नवा प्रोमो देईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर
या शोमधील गिफ्ट हँपरविषयीही कमालीची उत्सुकता आहे. आता हे गिफ्ट सेलिब्रिटी कलाकारांना दिलं जाणार म्हणजे ते तितकच किंमती असणार यात शंका नाही. करणने यापूर्वीही गिफ्ट हँपरमध्ये काय काय असतं हे सांगितलं आहे. जसं की यामध्ये गोल्ड ज्वेलरी, आयफोन, आयपॅड, ब्रँडेड अॅक्सेसरीज यांचा समावेश असतो. एका गिफ्ट हँपरची किंमत ६ ते ७ लाख असते.

या शोसाठी करण जोहर किती मानधन घेतो याचीही उत्सुकता आहे. एका एपिसोडसाठी करणच्या खात्यात २ कोटी रूपयांपर्यंत मानधन जाते. लवकरच करण त्याची फी वाढवणार असल्याचीही चर्चा आहे. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ६ सीझनमध्ये एकही सेलिब्रिटी जोडी रिपीट झालेली नाही. त्यामुळे दरवेळी नवी जोडी कशी आणता येईल यावर बॅकस्टेज खूप प्लॅनिंग सुरू असतं.
सगळयाम महत्वाचं म्हणजे या शोमध्ये येणारे काही सेलिब्रिटी एकमेकांची पोलखोल करण्याच्या नादात वादग्रस्त विधानंही करतात. त्यामुळे काही वाद ओढवला जाऊ नये यासाठी या शोच्या निर्मात्यांनी एडिटिंग कात्री तयार ठेवलेली असते. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या शोमध्ये कंगना रणौतने केलेल्या विधानामुळे चर्चा झाली होती. त्यामुळेच शूटनंतर एडिटिंगवर जास्त लक्ष दिलं जातं.