मुंबई: प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटचे बादशाह अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala ) यांचं आज मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात अखेचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांच्या निधनावर देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केलाय. पाच हजार रुपयांतून तब्बल ४० हजार कोटींचं साम्राज्य उभं करणाऱ्या झुनझुनवालांचं बॉलिवूड कनेक्शन खूप कमी जणांना माहित आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी १९९९मध्ये हंगामा डिजिटल मीडिया ही इंटरटेनमेंट कंपनी सुरू केली होती. काही वर्षानंतर या कंपनीचं नाव बदलण्यात आलं. हंगामा डिजिटल मीडिया इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड असं करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर, झुनझुनवाला यांनी काही बॉलिवूड चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

अभिनेता अविष्कार दारव्हेकर पुन्हा विवाहबंधनात , पत्नीसोबत फोटो शेअर करत म्हणाला…
२०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर गौरी शिंदे हिनं हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट श्रीदेवींसाठी महत्त्वाचा होता, कारण या चित्रपटाद्वारे त्यांनी कमबॅक केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय झुनझुनवाला घेतला. आणि त्यांचा हा निर्णय देखील योग्य ठरला. परदेशातही हा चित्रपट गाजला होता.

यानंतर झुनझुनवाला यांनी अमिताभ बच्चन अक्षरा हसन आणि धनुष यांच्या भूमिका असलेल्या ‘शमिताभ’ या चित्रपटाचीही निर्मिती केली होती.

इतकंच नाही तर २०१६मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी ‘की अॅंड का’ या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. चित्रपटानं १०० कोटींहून अधिकची कमाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here