मुंबई: करण जोहरची (Karan Johar) हवा आहे ती सध्याच्या त्याच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) शोच्या सातव्या सीझनमुळे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्रेकअप, अफेअर, डिव्होर्स, रिलेशनशिप या बातम्या करणच्या खिशात असतात असं म्हटलं जातं. कॉफी विथ करण या शोमध्येही तो सेलिब्रिटींडून त्यांचे खाजगी आयुष्यातील किस्से बरोब्बर काढून घेतो.

अर्थात, तुला काय करायचं आहे इतरांच्या खाजगी आयुष्याशी असं म्हणत नेटकरी करणला ट्रोलही करतात, पण करण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कोण कुणाला डेट करतय, कुणाचं अफेयर कुणाशी सुरू आहे याची चाचपणी करत असतो. आता बॉलिवूडमधील अशाच एक अफेयरबद्दल करणने खुलासा केला आहे. कोण आहे ती जोडी ज्यांच्याबद्दल करणने मौन सोडलंय.

हे वाचा-अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी हे कलाकार होते भारतीय सैन्यात; अशी केलेली देशसेवा

बॉलिवूडमध्ये ज्या कपलच्या रिलेशनशिपची आणि ब्रेकअपची चर्चा झाली ती जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. त्यांच्याबद्दलच करणने गौप्यस्फोट केला आहे. करण म्हणाला की, ‘होय एकेकाळी कार्तिक आणि सारा प्रेमात आकंठ बुडाले होते. ‘लव्ह आजकल २’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांच्यात जवळीक वाढली. ते एकमेकांना डेट करत होते, पण नंतर काय झालं माहीत नाही पण त्यांनी ब्रेकअप केलं.’

Kartik sara

करणवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत इतरांच्या खाजगी गोष्टी उघड न करण्याचा सल्ला दिला. आर जे सिध्दार्थ कन्नन याच्या शोमध्ये करणने सारा आणि कार्तिकच्या नात्यातील सत्य उघडकीस आणलं.

करणने मात्र त्याची बाजू सांगितली आहे. सारा आणि कार्तिक यांच्यातील अफेअर ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. त्यामुळे मला ट्रोल करण्याची गरज नाही. लोकांना वाटतंय की सारा आणि कार्तिकच्या रिलेशनशिप किंवा ब्रेकअपबद्दल फक्त मीच बोलतोय, पण असं नाही. त्या दोघांचे एकत्र फोटो व्हायरल झाले होते. जे उघड सत्य आहे ते सांगण्यात मी काही चूक केली असं मला वाटत नाही.

हे वाचा-उर्मिला निंबाळकरचा ‘नारी इन सारी’ लूक पाहिला का? नेटकरी म्हणतायंत ‘सेक्सी मॉम’

सारा आणि कार्तिक यांचं अफेअर फार काळ टिकलं नाही. त्यांच्यात काय बिनसलं हे कुणालाच माहीत नाही. करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये जेव्हा सारा आली होती तेव्हा तिला कार्तिकविषयी करणने विचारले होते. तेव्हा साराने कार्तिक तिचा क्रश आहे असं सांगितलं होतं. पण लव्ह आजकल २ सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सारा आणि कार्तिक यांचं ब्रेकअप झालं होतं. दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्यानं त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झालं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here